मुंबई : राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर, आता जवळपास निम्मा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाउनच्या गर्तेत गेला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कोरोना रुग्ण घटण्याच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. राज्यात आज दिवसभरात नव्याने ४२ हजार ५८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, ५४ हजार ५३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्तांचा आकडा हा गेले काही दिवस सातत्याने ५० हजारांच्या वर असल्याने रिकव्हरी रेटमध्ये चांगली वाढ झाली आहे.
राज्याचा रिकव्हरी रेट आता ८८.३४ टक्के इतका झाला आहे. मात्र, नव्या कोरोना बाधितांची संख्या अद्यापही ४० हजारांपार असल्याने अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. सध्या राज्यात ३५ लाख २ हजार ६३० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८ हजार ८४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या १ लाख ०१ हजार १८१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
महत्वाच्या बातम्या
- दोस्ताना नंतर कार्तिकच्या हातात बिग बजेट सिनेमा ; मराठी दिग्दर्शकासोबत करणार काम
- …तर एक जबाबदार राज्य म्हणून तो आपला पराभव ठरेल; न्यायालयाची राज्य सरकारला चपराक !
- अन् ‘शक्तिमान’ हादरला; आधी स्वतः मृत झाल्याच्या अफवा नंतर बहिणीच्या मृत्यूची वार्ता !
- पुण्याच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ ! तर कोरोनामुक्तांचा आकडा अधिकच
- ‘बिनपगारी प्रवक्त्यांनी पवार साहेबांविरुद्ध कितीही ओरड केली तरी…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

