Share

आव्हाडांच्या खात्यातही ‘वसुली गॅंग’, तब्बल एक हजार कोटींचे टार्गेट; सोमय्यांचे गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. मुंबईत स्फोटकांनी गाडी सापडल्या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे दुखावलेल्या परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत पत्र लिहिले होते. देशमुखांनी सचिन वाझेंना १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा गंभीर आरोप देखील परमबीर सिंह यांनी केला होता.

यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून अनिल देशमुख यांच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. अशातच, आता भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यावर गंभीर आरोप केला आहे.

‘ठाकरे सरकारचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सहकार्याने  प्रविण कलमे वसूली घोटाळा’ हे मोठा आर्थिक गैरव्यवहार करत आहेत. एसआरए, म्हाडाच्या 100 बांधकाम व्यावसायिकांकडून 100 रुपये /चौरस फीट दराने वसुली करून एक हजार कोटींचं टार्गेट दिल गेलं आहे. प्रवीण कलमे हा गृहनिर्माणमधील वाझे आहे. त्यामुळे लाचलुचपत विभागाचे अतिरिक्त महासंचालक प्रभात कुमार यांच्याकडे तक्रार केली असून त्यांनी मला योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे,’ असं सांगत किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!