मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्य आणि देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या या लाटेत रुग्णसंख्येचा विस्फोट होताना दिसत आहे यामध्ये अनेक सर्वसामान्य नागरिक ते बॉलीवूड, मराठी मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तीसह राजकीय नेत्यांना देखील कोरोनाने गाठले आहे.
दरम्यान,गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्य शासन आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नियम पाळा, लॉकडाउन टाळा असं सांगत राज्यातील जनतेला इशारा दिला आहे. लॉकडाउनच्या बाबतीत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यासंबंधी चर्चा नेहमी सुरु असते. निर्बंध अधिक कडक करण्यासंबंधीचं पावलं राज्य शासन उचलणारच आहे. त्यादृष्टीने लोकांनी मानसिकता ठेवली पाहिजे, असं भाष्य राजेश टोपे यांनी केलं होतं.
तर, मागील काही महिन्यांमध्ये कोरोना आटोक्यात आल्यानंतर हॉटेल, पब, बार येथे देखील सोशल डिस्टंसिंग ठेवणे अपेक्षित होते. मात्र, मुंबईतील अनेक पब, बार मध्ये सर्व कोरोना नियमांना हरताळ पासून धांगडधिंगा सुरु असल्याचं समोर आलं होतं. या बारचालकांना सत्ताधारी पक्षांचा वरदहस्त असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली होती.
मानसिक तयारी ठेवा…
मंदिरे बंद, दुकाने बंद, मॉल बंद…
फक्त पब आणि बार सुरू pic.twitter.com/vJKrMaclDm— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 1, 2021
याच मुद्द्याला हात घालत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राजेश टोपेंच्या विधानाची खिल्ली उडवली आहे. ‘मानसिक तयारी ठेवा…मंदिरे बंद, दुकाने बंद, मॉल बंद…फक्त पब आणि बार सुरू’ अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील संभाव्य लॉकडाऊनला विरोध करण्यासाठी संजय निरुपमांचे आंदोलन
- उदयनराजेंना दणका, महाविकास आघाडी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- औरंगाबादेतील ‘मिनी मंत्रालय’ जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा
- राज्यात रक्तसाठ्याची भीषण टंचाई, कोरोनाला न घाबरता रक्तदान करा; आव्हाडांचे आवाहन
- ‘…की, निवडणुका लक्षात घेता व्याजकपात करण्याचा निर्णय मागे घेत आहात ?’

