नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण इतके झपाट्याने बदलले की, महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे 13 हून अधिक आमदारांसह सुरतला पोहोचल्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना तातडीची बैठक बोलावावी लागली. या गदारोळात माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना हायकमांडने दिल्लीत बोलावले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनिल बापट, महेश शिंदे, शंभूराजे देसाई, शांतराम मोरे, बालाजी कल्याणकर, महेंद्र दळवी, भरत गोगावले, महेंद्र थोरवे उपस्थित आहेत. यासोबतच शिवसेनेचे आणखी काही आमदार रस्ते मार्गाने सुरतमधील ले मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचत आहेत.
त्याचवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपला आजचा नाशिक दौरा रद्द करून सर्व कार्यक्रम सोडून पक्षातील बड्या नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्ली गाठली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना दिल्लीत येण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदे समर्थक आमदारांचा फोन नॉट रीचेबल
त्याचवेळी एकनाथ शिंदे यांचे समर्थक प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, शहाजी बापू पाटील, शंभूराजे देसाई, संजय राठोड यांचा नॉट रीचेबल आहे. अशा स्थितीत शिवसेनेत मोठी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांचा फोनही नॉट रीचेबल आहे. शिवसेना आमदार शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचा फोनही बंद येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

