🕒 1 min read
नवी दिल्लीः चीनी वस्तूंच्या वापराचे प्रमाण मर्यादित झाले असले तरी देखील कमी किंमतीतील स्मार्टफोन घेण्यासाठी लोक चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी चे फोन घेणे पसंत करतात त्यामुळे चीनी वस्तूंचा वापर जारी कमी करणायत आला आला तरी देखील स्मार्टफोन याला अपवाद आहे. आता देखील अशाच एका चीनी स्मार्टफोन मेकर कंपनी भारतात लवकरच आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंचवर दिसला आहे. या हँडसेटचे मॉडल नंबर RMX3085 आहे. हँडसेटला याआधी मलेशियाच्या TKDN आणि यूरोप च्या EEC सर्टिफिकेशन वेबसाइट पाहिले गेले आहे. गीकबेंच लिस्टिंगवरून उघड झाले आहे की, या फोनला लाँच करण्याआधी इंटरनली टेस्ट करीत आहे. या फोनमध्ये कोणकोणते फीचर्स मिळणार यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. परंतु, या फोनला आता लवकरच लाँच करण्यात येणार आहे.
गीकबेंच लिस्टिंग नुसार, रियलमीचा हा फोन 2.0GHz ची बेस फ्रीक्वेंसीचा मीडियाटेक ऑक्टा कोर प्रोसेसर सोबत येणार आहे. MT6785V/CD सोबत ज्या एसओसीचा उल्लेख करण्यात आला आहे. तो मीडियाटेक हीलियो G95 वाटत आहे. एसओसी ८ जीबी रॅमचा असून अँड्रॉयड ११ ओएसवर काम करतो. गीकबेंचच्या सिंगल कोर टेस्टिंग मध्ये फोनला ५३६ गुण आणि मल्टी कोर टेस्टिंगमध्ये १७०३ गुण मिळाले आहेत.
रियलमीने चीनमध्ये आपले नवीन रियलमी V11 5G ला लाँच केले आहे. हा रियलमीचा पहिला स्मार्टफोन आहे. जो Dimensity 700 चिपसेट सोबत येतो. फोनमध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस IPS LCD दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात १३ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : राज ठाकरे यांना जामीन मंजूर !
- ‘जो पर्यंत मोदी- शहांच समर्थन तो पर्यंत मी मुख्यमंत्री’
- ‘ड्रग्ज अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?’
- दानशूर कर्णाची उपमा देणे योग्य राहील असं कुणी विचारलं तर त्याचे उत्तर असेल फक्त रतन टाटा
- दावा तर मुख्यमंत्री पदावर देखील करता येऊ शकतो, भुजबळांचा कॉंग्रेसला अप्रत्यक्ष टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
