मुंबई : करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांवर मोठ संकट ओढावले होत. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत सोनू सूदने अनेक गरजूंना मदत करण्याचे कार्य केले. शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं, अनेकांना रोजगार मिळवून दिला. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे.
रियल लाइफ मध्ये हिरोची भूमिका निभावलेल्या सोनुने आता आपल्या फिल्मी करिअरसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पडद्यावर व्हिलनचा रोल करायचा नाही, असे सोनुने ठरवले आहे.
तेलगू फिल्म ‘अल्लूदू अधूर’मध्येही तो व्हिलनचा रोल करतो आहे. मात्र त्याच्या या निर्णयाला अनुसरून निर्मात्यांनी सिनेमात त्याच्या रोलमध्ये बदल केला आहे. अनेक सीन नव्याने लिहीले गेले आणि त्यांचे शूटिंग देखील नव्याने होणार आहे. आता सकारात्मक रोलच करायचे असे सोनूने ठरवले आहे. तरी आगामी चित्रपटांमध्ये सोनू कोणत्या प्रकारच्या भूमिका साकारतो हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार : मोदी
- ‘रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या प्रमाणे वागू नये’; नव्या संसद भवनावरून राऊतांची मोदींवर टीका
- करोनाची लस बनवणाऱ्या कंपन्यांना सरकारनं कायदेशीर संरक्षण द्यावं – पुनावाला
- मा. गो. वैद्य यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त
- प्रेग्नेंट अनुष्का शर्मावर टीम इंडियाच्या पराभवाचं खापर! नेटकऱ्यांनी केले ट्रोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
