🕒 1 min read
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे जसे असंख्य चाहते आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या लेखन शैली आणि सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या बिग बींच्या ब्लॉगची चाहते आणि वाचक आतुरतेने वाट पाहत असतात मात्र मात्र, अमिताभ यांच्या एका ब्लॉगनं चाहत्यांना धक्का बसला होता. अमिताभ यांच्या ब्लॉगमधून हे समोर आलं आहे, की त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना सर्जरी करावी लागणार आहे.
मेडिकल कंडिशन…सर्जरी…मी लिहू शकत नाही, एबी’. अमिताभ यांचा हा ब्लॉग पाहिल्यानंतर चाहतेही चिंतेत पडले अमिताभ ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना दररोजची माहिती देत असतात. मात्र यावेळी अमिताभ यांनी आपल्या सर्जरीविषयीची माहिती आपल्या ब्लॉगमधून शनिवारी दिली आहे.
T 3829 – Existence is a merciless complication .. an unresolved equation !!
हमारा अस्तित्व एक दयाहीन निर्मम जटिल उलझन है ; दो मात्राओं या संख्याओं का समीकरण जिसका समाधान या निराकरण अभी तक नहीं हुआ है
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 1, 2021
गेल्या दोन दिवसांपासून बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती काहीसी ढासळली आहे. दरम्यान त्याच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेनंतर प्रथमचं अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून चाहत्यांचे आभार मानले आहेत. यावेळी त्यांनी जीवन आणि मृत्यूमध्ये झगडणाऱ्या मानवाच्या आयुष्यासंबंधी एक बहुमोल संदेश दिला आहे.
यानंतर नुकतंच त्यांनी एक ट्वीट देखील केलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून जीवन आणि मृत्युच्या मध्ये झगडणाऱ्या समस्त मानवी आयुष्याला उद्देशून बहुमोल संदेश दिला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘माणसाचं आयुष्य हा एक दयाहीन गुंता आहे. त्याचं कोणाकडेही उत्तर नाही.’ त्यांचं हे ट्वीट आता चांगलंच व्हायरल होतं आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यामुळे चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच अनेकांनी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राठोडांवरील आरोपांवर इतके दिवस ठाकरेंनी शांत बसणं म्हणजे केवळ सत्तेची लालसा – भाजप
- इंधन दरवाढ…हा तर केंद्र सरकारचा सामान्यांच्या खिश्यावर दिवसाढवळ्या डल्ला
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण द्या; आठवलेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
