🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. शेतकरी, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, संजय राठोड यासारख्या अनेक मुद्द्यांनी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. विरोधकांचे मुद्दे त्यांनी शांतपणे मांडावेत, गोंधळ करु नये. विरोधकांनी मांडलेल्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा होईल, गोंधळाने काहीही साध्य होणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी घेतली आहे.
‘अक्कड बक्कड बंबे बो, 80, 90 पुरे 100’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असे फलक हातात घेऊन काँग्रेसने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. काँग्रेसच्या सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी आज सायकलवरून प्रवास करत विधान भवन गाठले. यावेळी काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हे सायकल आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि नेते आज सकाळी मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जमला. यावेळी त्यांच्या हातात इंधन दरवाढीचे निषेध नोंदवणारे फलक होते. त्यावर, ‘अक्कड बक्कड बंबे बो, 80, 90 पुरे 100’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असा मजकूर लिहिलेला होता. यावेळी काँग्रेस नेत्यांनी महात्मा गांधींना अभिवादन केल्यानंतर सायकलवरून विधानभवनाच्या दिशेने प्रवास सुरू केला. यावेळी नाना पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार प्रणिती शिंदे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे सर्वच आमदार उपस्थित होते.
राज्यात महाविकास आघाडी सरकार इंधनावर सेस व Vat मिळून २७ रूपये प्रतिलिटर वसुली करत आहे ते कमी करायला कधी सांगणार? कॅाग्रेसची अवस्था दयनीय झाली हे मात्र खर https://t.co/Vy5ViFi9JS
— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 1, 2021
कॉंग्रेसच्या या आंदोलनावर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी सडकून टीका केली आहे. ‘राज्यात महाविकास आघाडी सरकार इंधनावर सेस व Vat मिळून २७ रूपये प्रतिलिटर वसुली करत आहे ते कमी करायला कधी सांगणार? कॅाग्रेसची अवस्था दयनीय झाली हे मात्र खर’ असा घणाघात केशव उपाध्ये यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- वरळी : कोरोनाचे नियम फक्त गरिबांसाठी ? पबमधील व्हिडीओ शेअर करत मनसेच्या नेत्याने केला भांडाफोड
- सायकलवर विधानभवन गाठत काँग्रेसने नोंदवला इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध !
- हुश्श! शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला; महावितरणने वाढवून दिली मुदत
- राम मंदिर उभारणीसाठी जालना जिल्ह्यातून १३ कोटी रुपये निधी संकलीत
- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा देशातील अभिनव उपक्रम; अभिभाषणात राज्यपालांनी केले राज्य सरकारचे कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
