Share

मैदान गाजवलं : आरसीबीच्या हर्षल पटेलने मुंबईच्या निम्म्या संघाला माघारी पाठवलं !

Published On: 

चेन्नई : आजपासून आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आयपीएलची टशन यंदा भारतातच रंगणार असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना स्टेडियम मध्ये आयपीएलचा आनंद घेता येणार नाही. दरम्यान, यंदाच्या पर्वाचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूचा गतविजेत्या मुंबई इंडियन्सशी होत आहे.

चेन्नईमधील चेपॉक स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जात असून नाणेफेक जिंकून आरसीबीने पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सच्या सलामीवीर रोहित शर्माला व क्रिस लिनला सुरुवातीला आरसीबीच्या फिरकीपटूंनी त्रस्त केले. मात्र, रोहितने नंतर आक्रमक भूमिका घेतली आणि चौके, छक्के लगावले. मात्र, धाव घेताना लिन व शर्मा मधला समन्वय चुकला आणि युजवेंद्र चहलने रोहितला धावबाद केले.

यानंतर, किस लिनने सावध भूमिका घेत थोडा वेळ घेतला. त्यांनतर त्याने आक्रमक खेळी केली. तर, दुसऱ्याबाजूला सूर्यकुमारने देखील त्याला साथ दिली. मुंबईचा संघ मोठी मजल मारेल अशी अपेक्षा होती. मात्र, आरसीबीच्या योग्य रणनीतीमुळे मुंबई इंडियन्सला १५९ धावाच करता आल्या. पहिल्या डावात सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतले ते आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेल याने!

सुरुवातीला हर्षल पटेलला धावांचा मार खावा लागला. मात्र, ईशान किशन, हार्दिक पांड्या या इन फॉर्म बॅट्समनला त्याने पायचीत केले. एवढंच नाही तर मुंबईचा तगडा हिटर पोलार्डला देखील त्याने माघारी धाडलं. तर, कृणाल पांड्या आणि मॅक्रो जेन्सेन याला यांना देखील हर्षल पटेलने बाद केलं. शेवटच्या षटकांमध्ये मुंबईला एका मागे एक मोठे धक्के देऊन त्याने मुंबईच्या धावसंख्येला रोख लावली. चार षटकांमध्ये त्याने २७ धावा देऊन ५ बळी आपल्या खात्यात जमा केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!