Share

अर्जुन तेंडुलकरचे मुंबईकडून पदार्पण, इंग्लंडच्या महिला क्रिकेटरने दिल्या खास शुभेच्छा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बीसीसीआय नुकतीच सर्व संघांना त्यांच्या संघांमध्ये 22 खेळाडू निवडण्याची सूट दिली होती. त्यामुळे मुंबईच्या संघाने दोन नव्या खेळाडूंचा संघात समावेश केला. त्यामुळे अर्जुनची मुंबईच्या संघात निवड झाली.

वडील सचिन तेंडुलकरने गुजरातविरुद्ध रणजी करंडकात पदार्पण केल्याच्या जवळपास ३२ वर्षांनंतर मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या सिनियर संघाकडून खेळला. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या हरियाणाविरुद्धच्या सामन्यात अर्जुनला पदार्पणाची संधी मिळाली. त्यानंतर चाहत्यांपासून ते आजी-माजी क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. यात इंग्लंड महिला क्रिकेट संघाची सलामीवीर डॅनियल वॅट हिचादेखील समावेश आहे.

२१ वर्षीय अर्जुन हा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू आहे. हरियाणाविरुद्ध झालेल्या सामन्यात अर्जुनला ११व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले होते. मात्र त्याला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. असे असले तरी, गोलंदाजी करताना त्याने डावातील चौथ्या षटकातच हरियाणाचा सलामीवीर चैतन्य बिश्नोईची विकेट घेतली. अवघ्या ४ धावांवर त्याने यष्टीरक्षक आदित्य तरेच्या हातून बिश्नोईला झेलबाद केले होते.

यानंतर एका ट्विटर वापरकर्त्याने ट्विट करत अर्जुनची प्रशंसा केली. “मुंबई संघाच्या जर्सीत अर्जुनने ४ धावांवर चैतन्य बिश्नोईची पहिली विकेट घेतली आहे. या सामन्यातील पहिल्या षटकात त्याने १५ धावा दिल्या होत्या. पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनचे हे शानदार पुनरागमन ठरले आहे.”असे त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे. यावर प्रतिक्रिया देत डॅनियल हिने लिहिले की, “खूप खूप शुभेच्छा अर्जुन! अप्रतिम सुरुवात.” सोबतच तिने सलाम करतानाचे आणि हसतानाचे इमोजी टाकले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!