Share

‘राष्ट्रवादीच्या प्रेतयात्रेला जायला कुणीही तयार नाही’, दानवेंची शिवस्वराज्य यात्रेवर सडकून टीका

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी गाठीभेटी, राजकीय दौरे या सारख्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच जालन्यात पार पडलेल्या महाजनादेश यात्रे दरम्यान आयोजित जाहीर सभेत रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेवर सडकून टीका केली आहे.

याच पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे म्हणाले, ‘राष्ट्रवादीच्या प्रेतयात्रेला जायला कुणीही तयार नाही’ असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी शिवस्वराज्य यात्रेवर टीका केली आहे. तसेच भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवर दानवेंनी भाष्य केले आहे.

तसेच भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवर बोलताना दानवे यांनी भाजपची तुलना चक्क वॉशिंग मशीनसोबत केली आहे तर मोदी-शहांची तुलना चक्क निरमा पावडरशी केली, असे म्हणत दानवेंनी कार्यकर्त्यांसमोर वॉशिंग मशीन आणि निरमा पावडरचं भाजप कनेक्शन सांगितले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते मंडळी पक्षांतर करत आहेत. या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी-कॉंग्रेस मध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच राज्यातील विरोधी पक्षांचे १७ आमदार सध्या भाजप प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. येत्या ३१ तारखेला त्यातील चार जण भोकरदन येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी विश्वसनीय दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!