🕒 1 min read
नवी दिल्ली : भारत श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना मोहाली येथे सुरु आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना आपला पहिला डाव ५७४ धावांवर घोषित केला. या सामन्यात भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने नाबाद १७५ धावांची सर्वश्रेष्ठ खेळी केली. जडेजाने या खेळीत १७ चौकार आणि ३ षटकार ठोकले.
त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात श्रीलंका संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला या सत्रात त्याने ४ विकेट्स गमावून १०८ धावा केल्या. परंतु तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात संघाला जास्त धावा काढता आली नाहीत त्यामुळे संघ पहिल्या डावात १७४ धावांवर ऑलआउट झाला आहे. या डावात श्रीलंकेकडून निसानकाने सर्वाधिक नाबाद ६१ धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही खेळाडू जास्त वेळ मैदानावर टिकू शकला नाही. त्यामुळे संघावरती फॉलोऑनची नामुशकी ओढवली आहे.
भारताकडून पहिल्या डावात दीड शतक ठोकणाऱ्या रवींद्र जडेजाने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या व्यतिरिक्त बुमराह आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी २-२ तर शमीने १ विकेट्स घेतली.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
