मुंबई : आयपीएल 2022 चा 33 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 4 धावांची गरज होती आणि महेंद्रसिंह धोनीने चौकार मारून आपल्या संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्सच्या हाती पुन्हा एकदा निराशा आली आणि संघ या मोसमातील पहिल्या विजयापासून वंचित राहिला. यासोबतच संघाच्या नावावर सलग 7 सामने हरण्याचा नकोसा विक्रमही नोंदवला गेला.
या सामन्यादरम्यान, दोन्ही संघांनी उत्कृष्ट क्रिकेट खेळले आणि खेळाच्या भावनेची चांगली ओळख करून दिली. असाच एक क्षण चेन्नईचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्होच्या षटकात घडला. तेव्हा कायरन पोलार्ड स्ट्राइकवर होता. ब्राव्होच्या एका चेंडूवर पोलार्डने बचावात्मक शॉट खेळला. चेंडू थेट ब्राव्होकडे गेला आणि त्याने चेंडू वेगाने पोलार्डच्या दिशेने फेकला. चेंडू पोलार्डकडे येताच त्याने बॅट फिरवली. मात्र, चेंडू त्याच्या बॅटला लागला नाही. यानंतर पोलार्ड धावत ब्राव्होकडे आला आणि त्याने त्याच्या डोक्याचा किस घेतला. पोलार्ड आणि ब्राव्हो अनेक वर्षांपासून वेस्ट इंडिजकडून खेळले आहेत. दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे.
https://twitter.com/cric_big_fan/status/1517159956503416833
चेन्नई आणि मुंबई यांच्यात जेव्हा कधी टक्कर होते तेव्हा दोघांमध्ये अश्या घटना पाहायला मिळतात. यापूर्वीही ब्राव्होने मैदानावरच पोलार्डच्या पायाला स्पर्श केला होता. ब्राव्होची ही शैली चाहत्यांना खूप आवडली होती.
महत्वाच्या बातम्या :


