Share

IND Vs SA : रवी शास्त्रींचा विराटला पाठींबा ; म्हणाले, “अजून दोन वर्ष…”

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : विराट कोहलीने ७ वर्ष भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद यशस्वी रित्या भूषवल्यानंतर २०२२ च्या सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. विराटला गेल्या वर्षीच एकदिवसीय, टी-२० आणि आरसीबीच्या संघाच्या कर्णधारपदाला रामराम ठोकावा लागला होता. मात्र टेस्ट मध्ये भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या कोहलीने अचानक टेस्टच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणे सर्वांसाठीच आश्चर्यकारक होते. चाहते आणि माजी खेळाडूंच्या वक्तव्यानंतर आता माजी कोच रवी शास्त्री यांनी त्याच्या नेतृत्वाबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना शास्त्री यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “विराटने नक्कीच अजून २ वर्ष कसोटीत यशस्वी रित्या नेतृत्व केले असते.  कारण येत्या दोन वर्षात भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे. प्रतिस्पर्धी हे रँकिंगमध्ये ९ व्या किवा १० व्या ठिकाणी आहेत. त्यामुळे अशा स्थितीत विराटने ५० ते ६० विजय मिळवून दिले असते. पण काही लोकांना हे पचवता आले नसते.” अशा शब्दात माजी कोच शास्त्रींनी माजी कर्णधार विराटला जाहीर रित्या पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे.

विराट आणि रवी शास्त्री यांच्या कोच-कॅप्टन जोडीने भारतीय संघाला अनेक मोठे जेतेपद मिळवून दिले आहे. विराट कोहली (virat kohli) टेस्ट कॅप्टन असताना भारतीय संघ टेस्ट रँकिंग मध्ये बराच काळ पहिल्या स्थानावर राहिला आहे. सोबतच ६० सामन्यात ४० विजयाची यशस्वी नोंद त्याच्या नावावर आहे. रवी शास्त्री यांनी विराटच्या राजीनामा नंतर सोशल मिडीयावर एक पोस्टही लिहिली होती. ज्यात त्यांनी सोबत बनवलेल्या या यशस्वी टेस्ट संघाबाबत लिहले होते. रवी शास्त्रींनी आता केलेल्या वक्तव्याचे देखील चाहत्यांकडून समर्थन केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!