नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी अखेर विराट कोहलीला (Virat Kohli) वनडे फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून हटवण्याबाबत वक्तव्य केले आहे. परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळता आली असती असे शास्त्री म्हणाले आहेत. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री यांनी याप्रकरणी मौन सोडले आहे.
मुलाखतीत शास्त्री म्हणाले की, “विराटने या कथेची बाजू सांगितली आहे, बोर्ड अध्यक्षांनी या कथेत आपली बाजू सांगण्याची गरज आहे. चांगल्या संभाषणामुळे परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळता आली असती.” याप्रकरणी रवी शास्त्री यांनी कमी बोलणेच पसंत केले.
T20 विश्वचषकापूर्वी सर्वात लहान फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा करणाऱ्या कोहलीला नंतर निवड समितीने एकदिवसीय कर्णधारपदावरून वगळले होते. त्याची हकालपट्टी केल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते की, कोहलीला टी-२० कर्णधारपद सोडू नये असे सांगण्यात आले होते, पण तो मान्य झाला नाही. एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटमध्ये दोन कर्णधार नसावेत, असे निवडकर्त्यांना वाटते. म्हणून कोहलीला एकदिवसीय कर्णधारपदावरून देखील वगळण्यात आले. मी वैयक्तिकरित्या कोहलीशी बोललो होतो असेही दादांनी सांगितले. यानंतर या प्रकरणावर वक्तव्य करताना कोहली म्हणाला की, त्याला कोणीही काहीही सांगितले नाही.
कोहलीच्या वक्तव्यानंतर या प्रकरणाने पेट घेतला आणि सर्वत्र चर्चेचा विषय बनला. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर कोहली एकदिवसीय मालिकेत खेळणार नसल्याच्या बातम्याही आल्या होत्या मात्र तो खेळण्यासाठी उपलब्ध आहे आणि खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तरी खासगीकरणाचा ‘कोंबडा’ रोज आरवतोच आहे, हे तरी लक्षात घ्या!’
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध, रात्री जमावबंदी; आज होणार नवीन नियमावली जाहीर
- द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ‘विराट’सेनेचे फोटोशूट : पहा व्हिडिओ
- महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहिम… शेतकऱ्यांना मिळणार ‘हे’ महत्वाचे पाच लाभ
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य


