नवी दिल्ली : केंद्र सरकार विरुद्ध ट्विटर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खटके उडाल्याचं चित्र दिसून येत आहे. शुक्रवारी ‘डिजिटल मिलेनियम कॉपीराइट’ कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट जवळपास तासभर ब्लॉत करण्यात आले होते. यावर ट्विटरकडून खुलासा देण्यात आलाय. ही कारवाई एका गाण्यावरून करण्यात आल्याचे ट्विटरने सांगितले.
मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली होती. यामध्ये एका गाण्याचा समावेश होता. हे कॉपीराईट कायद्याचे कथित उल्लंघन असल्याचे मानत ट्विटरकडून अकाऊंट विरोधात कारवाई करण्यात आली होती.
‘सोनी म्युझिक एन्टरटेन्मेंट’द्वारे करण्यात आलेल्या एका क्लीपच्या दाव्यामुळे रविशंकर प्रसाद यांच्या ट्विटर अकाऊंटवर कारवाई करण्यात आली होती. या क्लीपमध्ये संगीतकार ए आर रहमान यांच्या ‘माँ तुझे सलाम’ या गाण्याचा वापर करण्यात आला होता. रविशंकर प्रसाद यांनी २०१७ साली हे ट्विट केलं होतं. हे ट्विट १९७१ च्या युद्धाच्या विजयाच्या वर्षपूर्ती निमित्तानं शहिदांना श्रद्धांजली देत व्हिडिओच्या स्वरुपात करण्यात आलं होतं.
ट्विटरच्या कारवाईनंतर रविशंकर प्रसाद यांनी नाराजी व्यक्त केली होती. ‘ट्विटरच्या या कृतीने माहिती तंत्रज्ञान 2020 च्या नियम 4 चे उल्लंघन केले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहे. कोणत्याही प्लॅटफॉर्मला आयटीसंदर्भात नवीन कायदा पाळावाच लागेल. यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ट्विटरच्या या कृतीतून हे स्पष्ट झाले आहे की ते बोलण्याच्या स्वातंत्र्याच्या बाजूने नाही, तर त्यांचा अजेंडा चालवण्यातच त्यांना रस आहे असे रविशंकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘सध्या स्वबळाचा विषय नाही, परिस्थिती पाहून निर्णय घेऊ’, दिल्लीहून परतल्यावर पटोलेंच्या भूमिकेत बदल
- देशमुखांवर ईडीची कारवाई; ‘आम्ही बघून घेऊ!’, राऊतांचा भाजपाला इशारा
- …म्हणून ‘बाबा का ढाबा’च्या मालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
- पेशावरला नमवत मुल्तानने पहिल्यांदाच पटकावले पीएसएल स्पर्धचे विजेतेपद
- ‘पुढील सामन्यात स्थान मिळेल का?’ सॅम करनने केले ट्विट


