Share

अडसुळांवरील कारवाई मराठी खातेदारांना न्याय देणारी- रवी राणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सिटी बॅंक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. आमदार रवि राणा यांच्या तक्रारीनंतर ईडीने अडसूळ यांना समन्स पाठवले आहे. त्यानंतर ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहचले होते. दरम्यान प्रकृती खालावल्याने आनंदराव अडसूळ यांना स्ट्रेचवरुन बाहेर आणण्यात आलं आणि नंतर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर या प्रकरणी तक्रार करणारे आमदार रवी राणा यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली असून ‘अडसुळांवरील कारवाई योग्यच असून ईडीनं मराठी खातेदारांना न्याय देणारं पाऊल उचललं आहे,’ असे ते म्हणाले आहेत.

यासंदर्भात बोलत असतांना राणा म्हणाले की,’मुंबई शहरात सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या १४ शाखा आहेत. त्या बँकेत ९० टक्के खातेदार हे मुंबईतील मराठी बांधव आहेत. गिरणी कामगार, डबेवाले, सर्वसामान्य लोक, निवृत्ती वेतनधारकांचा या खातेधारकांमध्ये समावेश आहे. मुलांची लग्नं, आजारपण व शिक्षणासाठी अनेक लोकांनी बँकेत ठेवी ठेवल्या होत्या. सुमारे ९८० कोटी रुपयांच्या या ठेवी होत्या. मात्र, तीन वर्षांपूर्वी अचानक सिटी बँक बुडाल्याची आवई उठवली गेली. तेव्हापासून लोक आपल्या पैशासाठी चकरा मारत आहेत. काही लोकांना जीवही गमवावा लागलाय. त्यासाठी बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ जबाबदार आहेत.’

दरम्यान, पुढे ते म्हणले की,’बँकेच्या पाच-सहा शाखांच्या मालमत्ता मुलगा आणि जावयाच्या नावानं आहेत. त्या मालमत्ता बँकांना भाड्याने दिल्या आहेत. अडसूळ यांनी खातेदारांची फसवणूक केली आहे. एक कोटीची मालमत्ता असलेल्या बिल्डरांना पाच कोटींचे कर्ज दिले. पाच कोटींची मालमत्ता असलेल्या ठेवीदारांना २० कोटी रुपयांचे कर्ज दिले. त्यात अडसूळ यांना २० टक्के कमिशन मिळालं आहे. या सगळ्या कारभारामुळे अखेर बँक बुडाली. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडं तक्रार करण्यात आली होती. मात्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असल्याने  कारवाई झाली नाही. फाइल दाबून ठेवली गेली. आता ईडीने निष्पक्षपातीपणे कारवाई केली. त्याचे मी स्वागत करतो’ असेही राणा म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!