🕒 1 min read
पुणे : अभिनेते आणि शिंदे गटाचे उपनेते शरद पोंक्षे पुण्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या कार्यक्रमाची मूळ संकप्लना ही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आधारित होती. या कार्यक्रमाला शरद पोंक्षे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना काँग्रेस आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
“स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही रोज उठल्यावर विरोधकांना सावरकर लागतात. हिंदू समाजाला दुखवायचं असेल कि सावरकरांवरच चिखलफेक करतात. ही मुलं बघा अन तो दिल्लीतला मुलगा पण बघा. या मुलांना कळतंय पण तो एवढा ५० वर्षांच्या मोठा घोडा झाला तरी अजून गोळवलकर बोलता येत नाही”, अशी गंभीर टीका त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केली.
तसेच पुढे ते असेही म्हणले की, “असेच सावरकरांचे कार्यक्रम करत राहा. सावरकरांच्या कार्यक्रमांचं लोन महाराष्ट्रभर पसरलं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझे स्नेही आहेत. मंत्रिमंडळ स्थापन झाले की मी त्यांना या कार्यक्रमाची डीव्हीडी जबरदस्तीने बघायला लावेन. महाराष्ट्रातील शाळेत हे कार्यक्रम झाले पाहिजे. दोन दोन बस घेऊन महाराष्ट्रभर या कार्यक्रमाचे प्रयोग झाले पाहिजेत. कारण इथं असणारे सगळे सावरकर प्रेमी आहोत”. तसेच सध्या अनेक शाळांमध्ये सावरकरांचे फोटो लावले जात नाहीत. त्यांचा धडा शिकवला जात नाही, मात्र अशा शाळांमध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनातर्फे असा कार्यक्रम करायला लावू, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
महत्वाच्या बातम्या:
- Krunal Pandya : कृणाल पंड्या बनला बाप! पोस्ट शेअर करत मुलाच्या नावाचाही केला खुलासा, पाहा PHOTO!
- Nitin Gadkari | आता जे राजकारण पाहतो, ते केवळ शंभर टक्के सत्ताकारण आहे – नितीन गडकरी
- Nitin Gadkari : राजकारण केव्हा सोडू, केव्हा नको असे वाटतेय; नितीन गडकरींनी सांगितली मन की बात
- Monkeypox | केरळ पाठोपाठ दिल्लीतही आढळला मंकीपॉक्सचा रुग्ण; WHO कडून आरोग्य आणीबाणी घोषित
- Nitin Gadkari | … उंदरासारखे आमचे फोटो लावतात, स्वतःचा मोठा फोटो लावतात – नितीन गडकरी


