पटना : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे . कोरोना पार्श्ववभूमीनंतर ही पहिली निवडणूक असून, संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. दरम्यान, बिहारमधील चालू असलेल्या या निवडणुकीच्या निकालावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील येण्यास सुरुवात झाली आहे.
संजय राऊतांनी देखील बिहार निवडणूकीवर ट्विट केले आहे, बिहार निवडणुकीवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, बादशाह तो वक्त होता है….. इन्सान तो युं ही गुरूर करता है! या नंतर तेज प्रताप यादव यांनी देखील ट्विट करत, तेजस्वी भवः बिहार! असे म्हणत तेजस्वी यादव हेच ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास दाखवला आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 10, 2020
या निवडणूकीमध्ये तेजस्वी यादव यांचा प्रभाव दिसून येत आहे. मतदानोत्तर एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये महागठबंधनचा विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आता प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर हा अंदाज कितपत खरा ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या
- जो बायडेनना शेअर बाजाराची देखील सलामी; मुंबई शेअर बाजारामध्ये सेन्सेक्सचा ऐतिहासिक उच्चांक
- कमला हॅरिस यांचा विजय आणि मल्लिका शेरावतच ११ वर्षांपूर्वीच्या ट्विट होतय व्हायरल…
- ‘उद्धव ठाकरे यांचे ‘ते’ विधान म्हणजे शिखंडीच्या आड दडून टीका करण्यासारखे आहे’
- हिटमॅन रोहित शर्माच्या फॅन्ससाठी महत्वाची बातमी!, बीसीसीआयने घेतला ‘हा’ निर्णय
- शरद पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; रयततर्फे २.७५ कोटी रुपये निधीचा चेक सोपवला


