Share

आरोग्यव्यवस्थेवरून राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…

Published On: 

अहमदनगर : ६ नोव्हें.रोजी अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार या विभागात कोरोनाबाधित १७ रुग्ण उपचार घेत होते. या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्थेवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

यासंदर्भात राऊत लेखात म्हंटले आहे की,’राज्यात दिवाळी साजरी होत असतानाच नगरच्या दुर्घटनेने आनंद होरपळून खाक झाला आहे. नगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागास शनिवारी आग लागली. त्यात ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू व्हावा हे धक्कादायक आहे. अतिदक्षता विभागात रुग्णांना प्राण वाचविण्यासाठी आणले जाते, पण गेल्या दोनेक वर्षांत राज्यातील रुग्णालयांत अनेक ठिकाणी अग्नितांडव भडकले. या आगीची ठिणगी बहुतेक वेळा अतिदक्षता विभागातच पडली असल्याचे दिसत आहे. आतादेखील नगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागासच आग लागली आणि त्यात ११ जणांचा मृत्यू झाला. गोंदिया, नाशिक, मीरा-भाईंदर, वसईसारख्या ठिकाणी गेल्या दोन वर्षांत इस्पितळांना आगी लागल्या. त्यात अनेक कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले. अशा आगी लागून प्राणहानी झाली की, लोकांच्या संतापाचा तेवढ्यापुरता उद्रेक होतो. विरोधी पक्षाचे लोक राजकीय थयथयाट करतात. सरकार चौकशीचे आणि कठोर कारवाईचे आदेश देते. अश्रू ढाळून मृतांच्या नातेवाईकांना दोन-पाच लाखांची मदत करते, पण अशा दुर्घटनांचा सिलसिला कायम राहतो. इस्पितळांना आगी लागायच्या काही थांबत नाहीत. फक्त आगीची कारणे शोधायची व मागच्या आगीचे पान पुढे ढकलायचे असे वर्षानुवर्षे चालले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी हे आध्यात्मिक गृहस्थ आहेत. देशात सुखशांती नांदावी आणि लोकांचे कल्याण व्हावे यासाठी ते सदैव ईश्वरचरणी प्रार्थना करीत असतात. नुकतेच ते रोमच्या व्हॅटिकन सिटीत जाऊन पोप फ्रान्सिस यांना भेटले व जगाच्या कल्याणासाठी आशीर्वाद घेतले. आता लगेच ते केदारनाथच्या गुहेत जाऊन ध्यानाला बसले. त्यांच्या ध्यानातून जी आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली, त्यातून देशावरील संकटे दूर होतील, लोकांचे कल्याण होईल असे वाटत असताना पाटण्यात विषारी दारूचे ३२ बळी गेले व नगरच्या आगीत ११ जण होरपळले गेले. ध्यानसूत्रात विघ्न आले की, दुर्घटना घडतात अशी एक अंधश्रद्धा आहे. देशाची आरोग्य यंत्रणा कशी पह्ल आणि गोलमाल आहे त्याचा पर्दाफाश कोरोना काळात झालाच आहे. आरोग्य व्यवस्थेवर सगळय़ात कमी खर्च करणारा विशाल देश असे आपल्या बाबतीत बोलले जाते. देशातील आरोग्य व्यवस्था भुसभुशीत पायावर उभी आहे. आजही दुर्गम भागात, खेडय़ापाडय़ांत इस्पितळे नाहीत, रुग्णवाहिका नाहीत. रुग्णांना पाठीवर उचलून पिंवा झोळीत बांधून न्यावे लागते. अनेकदा मृतदेहांची ससेहोलपट होताना दिसते. हे चित्र तथाकथित महासत्ता म्हणवून घेणाऱ्या देशाला शोभत नाही, असेही राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!