Share

राऊतांना मलिकांच्या नजरेतून हिंदुस्तान बघायचा आहे; वानखेडे प्रकरणावरुन चित्रा वाघ आक्रमक

Published On: 

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडेंना चांगलंच धारेवर धरलं आहे. क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि त्याच्यासह इतर अनेक जणांना २ ऑक्टोबर अटक करण्यात आले. त्यानंतर सध्या काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. यावरून आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत प्रश्न विचारले आहे.

सर्वज्ञानी जनाब संजय जी राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुसलमान आहे हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे ?? न्यायालयीन प्रकरणावर अशा गलीच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार करते, असं म्हणत चित्रा वाघ यांनी म्हणाल्या आहेत.

रोज राज्यातील लहान मुली-महिला यांच्यावर लैंगिक अत्याचार होत आहेत. या सगळ्या विषयावरती आपल्याला भाष्य करायचं नाही. पण तुम्हाला एनसीबीसारख्या स्वायत्त संस्थेतील एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या जातीवरून टार्गेट करायच आहे. त्यांच्यावर वैयक्तिक हल्ला करून त्याच्या कामावर फक्त दबाव आणायचा आहे. जनाब राऊत, तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पहायचा आहे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!