पुणे: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक विधान केले आहे. (Chandrakant Patil sensational statement) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजकारण गढूळ झालय असं वाटत असेल आणि ते सुडाचे राजकारण करत नसतील तर त्यांनी सर्वांत अगोदर संजय राऊतांना शांत करावे, मग सर्व काही ठिक होईल. संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांचं घर उद्ध्वस्त करायची सुपारी घेतली आहे असा माझा अंदाज आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरेंनी आता राऊतांचे बटन ऑफ करून त्यांना शांत करावं. आपोआप सगळं शांत होईल. दरम्यान पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण आणि अपंगांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच येरवडा येथील क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे युवक संघटना आणि आरपीआय आठवले गटाच्या वतीनं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी रामदास आठवले यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी आठवले यांनी शिवसेना-भाजपने एकात यावे असे म्हंटले होते. यावरच चंद्रकांत पाटील म्हणाले की, “भाजप-सेनेने एकत्र यावे ही रामदास आठवले यांची मनापासून इच्छा दिसून येत आहे. पण आपण जी इच्छा व्यक्त करतो तसं होतच असं नाही. जरी छगन भुजबळ मला भविष्य सांगणारे जोशीबुवा असं म्हणाले असले तरी मी भविष्य सांगणारा जोशीबुवा नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप-सेना एकत्र येतील की नाही ते मला माहिती नाही.”
महत्वाच्या बातम्या:
- Breaking News : चारा घोटाळयाप्रकरणी लालू यादव यांना पाच वर्षांची शिक्षा
- भारताच्या १६ वर्षीय ग्रँडमास्टर प्रग्नानंधाकडून वर्ल्ड नं १ कार्लसन पराभूत
- वाढदिवसासाठी सुट्टीवर येणार होता, पण त्याआधीच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना आले वीरमरण
- “…तर माझ्या बायकोला आणि आईला जाऊन विचारा”, राऊतांच्या ‘भ***’ वक्तव्यावर सोमय्या संतापले
- चारा घोटाळा : लालू यादव यांना पाच वर्षांची शिक्षा, सात लाखांचा दंड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

