🕒 1 min read
रांची: चारा घोटाळ्यातील राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासासह ६० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (Lalu Yadav sentenced to five years in prison for fodder scam) लालू प्रसाद यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
दरम्यान सीबीआय न्यायालयाने लालू प्रयाद यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावली असून सोबतच ६० लाखांचा दंडही ठोठावला आहे. १५ फेब्रुवारी रोजी सीबीआय न्यायाधीश एसके शशी यांच्या विशेष न्यायालयाने २१ फेब्रुवारी रोजी लालूंसह ३८ दोषींना दोषी ठरवत शिक्षेवर सुनावणीची तारीख निश्चित केली होती. सध्या लालू यादव रांची रिम्समध्ये उपचार घेत आहेत.
दरम्यान सुमारे २३ वर्षे जुने हे प्रकरण १९९० ते १९९५ दरम्यान झारखंडच्या डोरंडा येथे असलेल्या ट्रेझरीमधून १३९.३५ कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढण्याबाबत आहे. या प्रकरणात तब्बल ५७५ जणांचे जबाब घेण्यात आले. तर बचाव पक्षाचे वकील संजय कुमार यांनी म्हटले की, लालू प्रसाद यांना चारा घोटाळ्याच्या ४ प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. यात चाईबासा कोषागारातून बेकायदेशीर पैसे काढण्याचे दोन प्रकरण आहेत. दरम्यान लालू प्रसाद यांना देवघर आणि दुमका कोषागार प्रकरणात जामीन मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…तर माझ्या बायकोला आणि आईला जाऊन विचारा”, राऊतांच्या ‘भ***’ वक्तव्यावर सोमय्या संतापले
- चारा घोटाळा : लालू यादव यांना पाच वर्षांची शिक्षा, सात लाखांचा दंड
- वेस्ट इंडिजला पराभूत करताच भारतीय संघ बनला “वर्ल्ड नं. १”
- “…कॉंग्रेसला पुन्हा डावललेच,किती ही मानहानी”, केशव उपाध्येंचा खोचक टोला
- रायण राणेंना केंद्राचा जोर का झटका! सिंधुदुर्गातील चिवला बीचवरील ‘नीलरत्न’ बंगल्यावर कारवाईचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
