Share

शिवसेनेने हात झटकले; राऊत म्हणाले,’ती’ कारवाई मुख्यमंत्री कार्यालयाची नव्हे, गृहमंत्रालयाची

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, या घोटाळ्यांची माहिती देण्यासाठी तसेच काही ठिकाणांची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोल्हापूरकडे रवाना होण्याआधीच काल  कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना नोटीस बजावली  आणि त्यांना जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली. तरीही कोल्हापूरकडे निघालेल्या सोमय्या यांना अखेर कराडमध्ये रेलेवेतून उतरवण्यात आले. विशेष म्हणजे काल सोमय्या यांच्या मुलुंडमधील घराजवळ मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, या राजकीय नाट्यावर आता शिवसेनेने वेगळीच भूमिका घेतली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत बोलताना या सर्व प्रकरणातून शिवसेनेचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. आरोप करणाऱ्यांवर काल जी काही कारवाई झाली ती गृहमंत्रालयाने केली आहे. मी पूर्ण माहिती घेतली असून गृहमंत्रालयाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न निर्माण होईल असं वाटलं. त्यातून ही कारवाई झाली असून यासंबंधी मुख्यमंत्र्यांवर आरोपी करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाहीत असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

“कालपासून जे काही घडत आहे किंवा घडवलं जात आहे ते विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारचे आरोप करुन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं हा गेल्या काही दिवसांपासून विरोक्षी पक्षाकडून उपक्रम राबवला जात आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

“तुमच्याकडे पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस, तपास यंत्रणा आहेत. त्या सगळ्या संस्था, महाराष्ट्र पोलीस दल, राज्यातील संस्था निष्पक्षपणे तपास करत असता. पण तुम्ही केंद्र सरकारच्या आदेशावर महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर, प्रमुख लोकांवर आरोप करत असाल आणि त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर गृहमंत्रालय कारवाई करु शकतं. त्याची आता राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याची गरज नाही. मी मुख्यमंत्र्यांशी याविषयी बोललो असून याचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नसल्याचं सांगितलं आहे. गृहमंत्रालयाला जर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे असं वाटलं असेल तर त्यांनी तशी कारवाई केली असेल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!