Share

राऊतांनी घेतली पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

Published On: 

मुंबई : आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याकरिता थेट पवारांच्या मुंबईतील सिलव्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. ही एक सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी शरद पवार आणि संजय राऊतांचा महाविकास आघाडी सरकारमधील युती बांधून ठेवण्यामध्ये मोलाचा वाट आहे. त्यामुळे या भेटीमध्ये शासन आणि प्रशासनासंदर्भातील विषयांवर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, दोघांच्या या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेवरुन राऊत यांनी मागील काही दिवसांपासून भाजपाच्या काही नेत्यांवर टीका केल्याचेही चित्र बघायला मिळाले. यामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल राऊतांनी त्यांचे कान टोचले होते.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरु असताना सिलव्हर ओक आणि मातोश्रीवरुन सत्ता स्थापनेच्या चर्चा झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळेच सिलव्हर ओकमधील बैठकीत राऊत आणि पवारांमध्ये काय चर्चा होते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!