परभणी : कोणत्याही नागरिकांना एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या तसेच रेशन धान्य घेणाऱ्या कुटूंबप्रमुखांचे रेशनकार्ड रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परभणी येथील जिल्हा पुरवठा विभागाने १ फेब्रुवारी पासून या कार्डधारकांची शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार पुरवठा विभागाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिक्षापत्रिकांची तपासणी मोहिम सुरू केली आहे. दरम्यान १ लाखाच्या वर उत्पन्न असलेल्या कुटूंबप्रमुखांचे रेशनकार्ड रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या अंतर्गत बीपीएल, अंत्योदय, अन्नपुर्णा, केशरी, शुभ्र, आस्थापना कार्ड विविध प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणीसाठी १ फेब्रुवारी – ३० एप्रिल या कालावधीत ही मोहिम राबवण्यात येणार आहे.
एक कुटूंब एक शिधापत्रिका
तपासणीत एका कुटूंबाच्या पत्त्यावर दोन शिधापत्रिका देणार नाहीत. अपवादात्मक परिस्थितीत दोन शिधापत्रिका देण्याची गरज पडल्यास तहसिलदार खात्री करुन निर्णय घेणार असल्याचे आदेश दिले आहेत.
१ लाखावर उत्पन्न असणारे रेशनकार्ड रद्द करणार
दुसऱ्या वेळी, हयात नसलेले नागरिक तसेच खासगी नोकरी करणारे कर्मचारी, १ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे सर्व शिधापत्रिका रद्द करणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलन : कलाकार, क्रिकेटर यांच्या ट्विटच्या मागे भाजपचा हात ?
- धनंजय मुंडेच नव्हे तर महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांवर देखील झाले आहेत गंभीर स्वरूपाचे आरोप
- पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही केंद्राच्या हाती; अजित पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर
- ‘पाकिस्तान, चीनच्या बॉर्डरवर देखील अशी परिस्थिती नाही’
- उत्तरेकडील वाऱ्यामुळे तापमानात घट, परभणीचे तापमान ९.१ अंश


