नवी दिल्ली: टाटा समूहाचा भाग झाल्यानंतर एअर इंडिया मध्ये अनेक बदल होऊ लागले आहेत. असाच एक बदल घडला आहे की आता स्वतः रतन टाटा एअर इंडियाच्या प्रवाशांचे स्वागत करत आहेत. नुकतीच खासगी बनलेल्या एअर इंडियाने रतन टाटा यांच्या संदेशाची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे.
एअर इंडियाने बुधवारी रतन टाटा यांच्या संदेशाची क्लिप ट्विटरवर शेअर केली. १८ सेकंदांच्या या क्लिपमध्ये रतन टाटा यांचा आवाज ऐकू येत आहे. टाटा या संदेशात प्रवाशांचे स्वागत करत आहेत. ते लोकांना आश्वासन देत आहेत की एअर इंडियाला मिळून सर्वाधिक पसंतीची एअरलाइन बनवण्यात येईल. क्लिपमध्ये रतन टाटा यांच्या आवाजात म्हटले जात आहे की, टाटा समूह एअर इंडियाच्या नवीन ग्राहकांचे स्वागत करतो. प्रवाशांच्या सोयी आणि सेवेसाठी एअर इंडियाला पसंतीची एअरलाइन बनवण्यासाठी आम्ही एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.
गेल्या आठवड्यात गुरुवारी सरकारने एअर इंडिया टाटा समूहाकडे सोपवली. अशाप्रकारे एअर इंडिया ६९ वर्षांनंतर जुन्या मालकाकडे परतली.गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या लिलावात टाटा समूहाने १८ हजार कोटी रुपयांची सर्वात मोठी बोली लावून एअर इंडियावर आपले नाव कोरले.
महत्वाच्या बातम्या:
- विरोधी असल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पातून पुन्हा सिद्ध झाले; महिला काँग्रेसची टिका!
- चक्क रस्त्यावर फ्रेंच फ्राईज खाताना दिसली उर्फी जावेद, नेटकऱ्यांचे वेधले लक्ष
- “मी सचिनला बॉलिंग करायला घाबरायचो”; ब्रेटलीने केला मोठा खुलासा
- “दागिने उत्पादक कारखान्याद्वारे होईल १ लाख रोजगार निर्मिती”, सुभाष देसाईंची माहिती
- अभिनेते अमिताभ दयाल यांचे निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

