🕒 1 min read
पुणे : पिंपरी चिंचवड येथील आंबेडकर चौकात संयुक्त किसान मोर्चासह विविध पक्ष संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भारत बंद जनआक्रोश आंदोलन सध्या सुरु आहे. या आंदोलनामुळे चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.
आज संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने भारत बंद ऐलान करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने देशभरात विविध ठिकाणी जनआक्रोश आंदोलन सुरु आहे. सकाळी ६ वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली असून दुपारी ४ वाजता आंदोलनाचा समारोप होणार आहे.
पिंपरी चिंचवड येथेही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन संयुक्त किसान मोर्चा, कामगार संघटना, संयुक्त कृती समिती जन आंदोलन संघर्ष समिती, महाविकास आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने भारत बंद जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने आंदोलन उपस्थित होते. पिंपरी चिंचवड येथील आंदोलनात आंदोलकांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
पुणे शहरात भारत बंद आंदोलनाला समिश्र प्रतिसाद मिळताना दिसून आला. शहरातील मंडईतील टिळक पुतळ्यासमोरील आंदोलनात विविध संघटनांसह राष्ट्रवादी, काँग्रेस आिण शिवसेनेने सहभाग घेतला आहे. विविध पक्ष संघटनाकडून शहरात निदर्शने करण्यात येत आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून बहुतांष भागात वाहतूक सुरुळीत सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
- आनंदराव अडसूळ यांना ज्या प्रकरणात ईडीने समन्स पाठवलं ते प्रकरण नेमकं आहे तरी काय ?
- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात, इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले
- पश्चिम महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानाच्या उपयोगातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – नितीन गडकरी
- ‘अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या अवमानाची…’, मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचे खळबळजनक वक्तव्य
- धर्मांतर रॅकेट : नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला ATSने नाशकातून केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
