Share

ध्वजारोहणावेळी रश्मी आणि आदित्य ठाकरेंनी केला आचारसंहितेचा भंग; मुंबईत तक्रार दाखल

Published On: 

मुंबई : तब्बल अडीच महिन्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी प्रजाकसत्ताक दिनी आयोजीत कार्यक्रमाला हजेरी लावली. मुंबईतील शिवाजी पार्कवर ७३ व्या प्रजासत्ताक दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर जाण्यापूर्वी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे(Rashmi Thackeray), पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) आदी उपस्थित होते. त्यानंतर आता रश्मी आणि आदित्य ठाकरे यांच्यावर ध्वजारोहणावेळी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ध्वजारोहणावेळी रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाला सॅल्यूट केला नाही, तसेच आदित्य ठाकरे यांना नियमबाह्य पद्धतीने रेड कार्पेटवर बोलविण्यात आल्याचा आरोप अ‍ॅड. जयश्री पाटील(Jayashri Patil) यांनी केला असून यासंदर्भात त्यांनी पोलिसांत तसेच लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, आपल्या तक्रारीत जयश्री पाटील म्हणाल्या आहे की,‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देताना डोक्यावर गांधी टोपी घातली नाही. त्याबाबत माझा काहीच आक्षेप नाही. परंतु, प्रजासत्ताक दिनी रेड कार्पेटवर ध्वजवंदन करणारे उपस्थित असतात, यावेळी न विसरता सलामी द्यायची असते. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नींनी सलामी दिली नाही. त्यांना संविधान मान्य नाही का? यामुळे देशवासियांच्या भावना दुखावल्या असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा,’ अशी मागणी पाटील केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!