मुंबई : शहरातील मालाडमधील एका क्रिडा संकुलास टिपू सुलतान (Tipu Sultan) नाव देण्यावरुन चांगलाच वाद पेटला आहे. भाजप आणि बजरंग दल (Bjp And Bajrang dal) टिपू सुलतान नाव देण्यावरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज या क्रिडा संकुलाबाहेर भाजपसह बजरंग दलाने जोरदार आंदोलन केले आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
टिपूच्या बगलबच्चाना जनता योग्य धडा शिकवेल… अस्लम शेख यांना हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळू देणार नाही. pic.twitter.com/EX1rMGuBw3
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 26, 2022
आ. अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘टिपूच्या बगलबच्चाना जनता योग्य धडा शिकवेल… अस्लम शेख यांना हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळू देणार नाही’, असे अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
मालाडमधील ज्या क्रिडा संकुला बाहेर बाहेर बजरंग दलासह भाजपने जोरदार आंदोलन केले आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. आंदोलकांना आवर घालण्यासाठी यावेळी मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला. पालकमंत्री अस्लम शेख यांच्या समर्थनार्थ येथे त्यांचेही कार्यकर्ते जमले आहेत, आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर प्रतिक्रिया देताना म्हणाले, मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा संकुलाला ‘वीर टिपू सुलतान क्रीडा संकुल’ असे नाव देण्याचे प्रयत्न सत्ताधारी काँग्रेसकडून केले जात आहे. स्थानिक आमदार आणि काँग्रेसचे नेते तथा मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांच्या आमदार निधीतून हे सर्व काम होत आहे.
याचा लोकार्पण सोहळा बुधवार २६ जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याच्या आशयाचे फलक मालवणी परिसरात लावण्यात आले होते. टिपू सुलतान सुल्तान हिंदू विरोधी होता. त्याने हिंदूंची अनेक मंदिरे उध्वस्त केली, हजारो हिंदूंचे धर्मांतरण केले तसेच अनेक हिंदूंची क्रूरपणे हत्या केली आहे. अशा क्रूर आणि हिंदू विरोधी टिपू सुलतानचे नाव क्रीडा मैदानास देण्यास आमचा विरोध आहे. हे नामकरण त्वरित थांबविण्यात यावे, असे निवेदन आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप आणि बजरंग दलाने दिले आहे. असे विश्व हिन्दू परिषद, मुंबईचे प्रवक्ता श्रीराज नायर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
“काँग्रेस-राष्ट्रवादीने समजूतदारपणा दाखवला असता तर भाजपचा…”, जयंत पाटलांचे वक्तव्य
Republic Day: औरंगाबाद लवकरच १००% लसीकरणयुक्त होईल; पालकमंत्र्यांचे सुतोवाच..!
बाळासाहेबांवर केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांना संजय राऊतांचे प्रत्युत्तर
दीपिका पदुकोणने उलगडले बेडरूमचे रहस्य, म्हणाली “रणवीर बेडवर…”
लोकशाही प्रक्रियेत प्रजाच राजा; हा सोहळा मतदान करून साजरा करावा-अभिनेत्री चिन्मयी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

