मुंबई : बॉलीवुडचे पहिले सुपरस्टार आणि जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. आज ७ जुलै रोजी सकाळी ७.३० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांचे वय ९८ होते.
गेल्या काही दिवसापासुन दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. यामुळे उपचारासाठी त्यांना २९ जुन रोजी मुंबई येथील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज ७ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ साली त्यांचा जन्म झाला होता. दिलीप कुमार यांच्या निधनाची माहिती समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. –
Dilip Kumar Ji will be remembered as a cinematic legend. He was blessed with unparalleled brilliance, due to which audiences across generations were enthralled. His passing away is a loss to our cultural world. Condolences to his family, friends and innumerable admirers. RIP.
— Narendra Modi (@narendramodi) July 7, 2021
यावेळी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘चित्रपट सृष्टीमधील महान व्यक्ती म्हणून दिलीप कुमार नेहमीच लक्षात राहतील. चित्रपटांमध्ये त्यांचं तेज अतुलनीय होतं. त्यामुळेच त्यांनी अनेक पिढ्यांमधील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. दिलीप कुमार यांचं निधन हे आपल्यासाठी एक सांस्कृतिक नुकसान आहे. माझ्या सद्भावना त्यांच्या कुटुंबियाबरोबर, मित्रांबरोबर आणि असंख्य प्रशंसकांसोबत आहेत, देव त्यांच्या आत्मास शांती देवो,’ असे म्हणत त्यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जे तीस वर्षात झालं नाही ते आता काय होणार ?’; भाजपच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंच भाष्य
- राष्ट्रवादीच्या नेत्याचे शिवसेनेच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप, लाचलुचपत विभागाकडे केली तक्रार
- कृपाशंकर सिंह यांचा भाजप प्रवेश शिवसेना-कॉंग्रेससाठी धोक्याची घंटा
- पालखीस परवानगी नाकारली, महाराजांचा वारकर्यांसहित आत्मदहनाचा इशारा!
- ‘स्टंट’बाजी करून पाप झाकण्याचा प्रयत्न, अशोक चव्हाण यांचे भाजपवर टीकास्त्


