Share

रावसाहेब दानवेंची घोषणा ; गणेशोत्सावात कोकणात जाणाऱ्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Published On: 

मुंबई : गेल्या गणेशोत्सवात कोकणात जायला न मिळालेल्या चाकरमन्यांनी यंदा सुरुवातीपासूनच गावी जाण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल झाले असल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहे. रेल्वेने 5 ते 9 सप्टेंबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे अनेक कोकणवासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

यंदा रेल्वेनं चाकरमान्यांसाठी सोडलेल्या ७२ विशेष रेल्वे गाड्या फुल्ल झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोकणात जाण्यासाठी अधिकच्या गाड्या सोडण्याची मागणी भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडं केली होती. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सावात कोकणात जाण्यासाठी 72 स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तशी घोषणाच नवे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. गणेश उत्सवासाठी मुंबईतून आपआपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासियांची प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. सेंट्रल रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुन / पनवेल आणि सावंतवाडी रोड / रत्नागिरी दरम्यान विशेष 72 गाड्या चालवणार आहोत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!