Share

रावसाहेब दानवे यांनी देशातील शेतकऱ्यांची जाहीरपणे माफी मागावी : शिवसेना

Published On: 

करमाळा : दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन नसून या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त विधान भाजपचे नेते आणि केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. हे आंदोलन बाहेरच्या देशाचे षडयंत्र असून आपल्या देशातील लोकांनी याचा विचार केला पाहिजे, असेही दानवे म्हणाले. आंदोलन करणारे लोक हे सुटाबुटातील लोक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे कोणाच्या भूल थापांना बळी पडू नका, असे आवाहन देखील दानवे यांनी केले आहे. या वक्तव्यांमुळे दानवे यांच्यावर चौफेर टीका होत आहे.

दरम्यान, दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे चीन व पाकिस्तानचा हात आहे असे वक्तव्य करून भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचे काम केले आहे अशा रावसाहेब दानवे यांचा करमाळा तालुका शिवसेना निषेध करत असून दानवे यांनी देशातील शेतकऱ्यांची जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे

तालुकाप्रमुख सुधाकर लावंड यांच्या नेतृत्वाखाली शहर प्रमुख प्रवीण कटारिया तालुका संघटक संजय शिंदे युवा सेनेचे विशाल गायकवाड उपशहर प्रमुख संजय भालेराव उमेश पवार पंकज परदेशी यांच्या उपस्थितीत करमाळा तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले.

नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव शंभरीकडे नेले आहेत सत्तेवर येताना मोदी म्हणायचे मी पन्नास रुपये पेट्रोल-डिझेल देईन पण पण मोदी यांच्या करणे आणि कथनीत फरक असून त्यांनी घरगुती गॅस सही किमती वाढवल्या आहेत. केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी केंद्र सरकार काम करत असून या सर्व गोष्टीचा आज शिवसेना निषेध करत आहे. रावसाहेब दानवे यांनी माफी मागावी नरेंद्र मोदी यांनी डिझेल पेट्रोलचे दर कमी करावेत या मागणीचे निवेदन देण्यात आले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!