महाराष्ट्र देशा डेस्क : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. त्याने नुकतेच एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी न्यूड फोटोशूट केले आहे. त्याच्या या फोटोशूटमुळे इंटरनेटवर सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. त्याच्या फोटोंवर अनेक मिम्स देखील बनवले जात आहेत.
या फोटोंमध्ये रणवीर विना कपड्यांचा कार्पेटवर वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. काही फोटोंमध्ये रणवीर झोपून पोज देत आहे, तर काही फोटोंमध्ये तो उभा राहून पोज देताना दिसत आहे. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने त्याच्या चित्रपटांबद्दल आणि फॅशनबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. या फोटोशूटबद्दल विचारल्यावर त्याने सांगितले की, “शारीरिकरित्या नग्न राहणे माझ्यासाठी खूप सोपे आहे. माझ्या काही परफॉर्मन्सने मला नग्न केले होते. तूम्ही त्यात माझा आत्मा पाहू शकता. तो किती नग्न आहे? हजारो लोकांसमोर मी माझे सर्व कपडे काढू शकतो. मी हजारो लोकांसमोरही हे न्यूड फोटोशूट करू शकतो. मला काही हरकत नाही, मला काही फरक पडत नाही. पण तिथे उपस्थित लोक थोडे अस्वस्थ होतील.”
सोशल मीडियावर या फोटोशूटमुळे रणवीरची खूप खिल्ली उडवली जात आहे. एकाने युजरने या फोटोंवर कॉमेंट केली कि, “हे बघून दीपिका दीदी काय म्हणतील?” तर दुसर्याने लिहिले, “जेव्हा दीपिका सर्व कपडे लॉन्ड्रीला पाठवते.” तर एक जण म्हणाला , “मी माझा संपूर्ण पगार स्विगी आणि झोमॅटोवर खर्च केल्यानंतर” पण सर्वात जास्त एक कॉमेंट पाहायला मिळाली ती म्हणजे, “फक्त रणवीर सिंगच हे करू शकतो.” असेच अनेक फनी मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून रणवीर सिंग चांगलाच ट्रेंड होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sudhir Mungantiwar | आदिवासी बांधवांच्या नृत्यात थिरकले सुधीर मुनगंटीवार, पाहा VIDEO
- Ramdas Kadam : आदित्य ठाकरेंचं जेवढं वय त्यापेक्षा जास्त काळ आम्ही राजकारणात; रामदास कदमांचा टोला
- Radhakrishna patil l महाराष्ट्रातील दोन्हीही काँग्रेस फुटीच्या मार्गावर आहेत – राधाकृष्ण विखे पाटील
- Samantha prabhu | “मला आणि नागाला एका खोलीत बंद केले तर…”; समंथा रुथ प्रभू काय म्हणाली वाचा
- Aditya Thackeray : “मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही”; आदित्य ठाकरे आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

