मुंबई : सध्या सोशल मीडियावर ‘कॉफी विथ करण ७’ची जोरदार चर्चा आहे. हा शो लोकप्रिय शो आहे. चाहते या शो’ला भरभरून प्रेम देतात. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी करणचे पहिले गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. रणवीरने त्याचं लग्न, बेडरुम सीक्रेट्स आणि सेक्स लाइफबद्दल या शोमध्ये बरेच खुलासे केले. त्यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे.
‘कॉफी विथ करणमध्ये रणवीरने पहिल्या रात्री सेक्स केल्याची देखील कबुली दिली त्याचबरोबर तो म्हणाला, “आम्ही हे आमच्या व्हॅनिटी व्हॅनमध्येही सेक्स केलं होतं आणि माझ्याकडे सेक्ससाठी वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत.” करण जोहरने रणवीरला, “लग्नाच्या सगळ्या विधी होईपर्यंत तू थकला नव्हतास का?” असा प्रश्न विचारल्यावर रणवीरनं नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाला, “नाही, मी फक्त जरा जास्त बिझी होतो.”
https://www.instagram.com/p/CfsqxikI6ky/
Coffee With Karan 7 शोमध्ये रणवीर आणि आलिया या दोघांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आलियाने देखील तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासे केले. यावेळी आलियाला लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी ती म्हणाली, “लग्नाच्या पहिल्या रात्री कोणी काहीच करत नाही. कारण लग्नाच्या एवढ्या सगळ्या विधी झाल्यानंतर आपण थकलेले असतो”.
महत्वाच्या बातम्या :

