Share

राज ठाकरेंच्या नावाने मागितली खंडणी; सिनेक्षेत्रातील तिघांना बेड्या

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या नावावर खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ देखील सध्या व्हायरल झाला आहे. राज ठाकरेंचं नाव घेत एका सुरक्षारक्षकाला दमदाटी करतानाचा व्हिडीओ असून या प्रकरणी आता तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

तू राज ठाकरेंना ओळखत नाहीस? काम कोणासाठी करतोयस? महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये राहतोयस ना तू? असे म्हणत, एका सुरक्षारक्षकाला मारहाण करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाने खंडणी मागितल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. याच प्रकरणी सध्या मुंबईतील मालवणी पोलीसांकडून सिनेसृष्टीतील तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

यामध्ये दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माता युवराज बोराडे आणि चालक सागर सोलणकर यांना अटक करण्यात आली आहे. तसेच पोलीसांनी याप्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला देखील नोटीस पाठवली आहे. ही अभिनेत्री मनसेची कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!