हिंगोली : वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आला असता शिवभक्तांकडून महाराजांचे ढोल ताश्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. अतिउत्साहात वसमतचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे आणि माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी महाराजांच्या घोड्यावर चढून हार अर्पण केला. यामुळे शिवभक्तांनी आमदार नवघरेचा व्हिडीओ व्हायरल करीत सामाज माध्यमांवर निषेध व्यक्त केला. त्यानंतर आमदार नवघरे यांनी जनतेची जाहीर माफी माघीतली.
मला खासदार हेमंत पाटील, डॉ. मुंदडा आणि काही कार्यकर्त्यांनी पुतळ्यावर चढवले नाहीतर मी घोड्यावर चढलो नसतो, असे स्पष्टीकरण आमदार नवघरे यांनी दिलं होतं. त्या नंतर आमदार नवघरेचा समाज माध्यमांवरून होणारा निषेध थांबला. पण मिरवणूक काढून गर्दी जमविल्या प्रकरणी खासदार हेमंत पाटील यांच्यासह आमदार नवघरे आणि इतर पाचशे जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्या नंतर शिवसेनेच्या बैठकीत या प्रकारावरून चांगलीच गरमा गरमी झाली.
हिंगोली येथे शनिवारी शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी स्वपक्षातील डॉ. जयप्रकाश मुंदडा यांना गद्दार संबोधले तर शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी आमदार नवघरेच्या या कृतीवर सडकून टीका केली. ‘आमदार झाला म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर जाऊन बसतो का, तुम्ही जे कृत्य केलं ते जनता कदापी सहन करणार नाही. मला खासदारांनी वर चढवलं अस म्हणतोय, तुमच्या पुढे कुणी शेण ठेवलं आणि हे शेण खा म्हटलं तर तुम्ही शेण खाता का?’ असा सवाल ही यावेळी आमदार बांगर यांनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारमधील महत्त्वाच्या समितीवर खासदार इम्तियाज जलील यांची फेरनिवड!
- सिंघू बॉर्डरवर हत्या करणारा सरवजीत म्हणतो, “मला अजिबात पश्चाताप होत नाही”
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
