Share

ठाकरे सरकारच्या कृपेने राज्यात खंडणीचा धंदा जोरात- अतुल भातखळकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी नेत्याने एका विद्यार्थ्याकडून तब्बल दहा लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी दोन जणांविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘ठाकरे सरकारच्या कृपेने राज्यात खंडणीचा धंदा जोरात आहे’, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

दरम्यान, अटक केलेल्या आरोपीचे नाव अमर सूर्यकांत पोळ असून त्याचा साथीदार पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष करण मधुकर कोकणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका २३ वर्षीय तरुणाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!