🕒 1 min read
सातारा: सैन्य जर सोबत असेल तर कोणतीही लढाई सहजरित्या जिंकता येते. त्यामुळे सक्षम बूथ बांधणी करून सैन्य निर्माण केले पाहिजे. असे विधान राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil ) यांनी केले आहे. ते राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात कऱ्हाड येथे बोलत होते.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटीलही उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब पाटील म्हणाले की, “पक्षात काम करताना पक्षाची भूमिका प्रत्येक गावातील जनतेपर्यंत पोहचायला हवी. यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे. त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.”
दरम्यान यावेळी पक्षाची सभासद नोंदणी करताना तालुक्यातील सर्व स्तरावरील लोकांना सहभागी करून घ्यावे, अशा सूचना जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- “भारत आमच्यासाठी काय आहे हे त्यांनी सांगायची गरज नाही” ट्रोल करणाऱ्यांना शमीचे सडेतोड उत्तर
- शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला किल्ले फिरणाऱ्या मंडळींनी सांगितला- मोहन भागवत
- कोरोना व्हायरसवर ‘थाली बजाओ’ प्रतिसाद देणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान- राहुल गांधी
- राजांनी मंदिरं बांधली पण त्या मंदिरांवर अधिकार…- मोहन भागवत
- अॅश्टन अगरला धमकी प्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे वक्तव्य; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
