🕒 1 min read
मुंबई : माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज आणि पाकिस्तानचे फलंदाजी सल्लागार, मॅथ्यू हेडन यांनी काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेसाठी त्यांच्या आगामी पाकिस्तान दौरा मध्यात सोडत असल्याने नाराजी दर्शवली आहे. वृत्तानुसार, स्टार खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यावर आयपीएलला प्राधान्य दिले. त्याच वेळी राष्ट्रीय संघ निवडक जॉर्ज बेली यांनी पुष्टी केली की ६ एप्रिलपूर्वी कोणताही खेळाडू आयपीएलमध्ये सामील होऊ शकत नाही, आयपीएलच्या क्वारंटाइन प्रोटोकॉलच्या आवश्यकतेमुळे खेळाडूंनी आणखी सामने गमावले असते.
मॅथ्यू हेडनने (matthew hayden) याबाबत नाराजी व्यक्त करत सांगितले “जेव्हा खेळाडू त्यांच्या देशासाठी न खेळण्याचा निर्णय घेतात तेव्हा ते तुमच्या चिंतेचे मोठे करणं आहे. मला असे वाटते की क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (cricket australia) नेतृत्व अलीकडेच खेळाडू करत आहेत आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जेव्हा तुम्हाला ऑस्ट्रेलियासाठी खेळायचे असेल तेव्हा तुम्ही ते ऑप्शन म्हणून बघू शकत नाही. त्याचा मला काही अर्थ लागत नाही. जर तुम्ही ऑस्ट्रेलियासाठी खेळण्यासाठी अनुपलब्ध असाल तर काही जबाबदारी घ्यावी लागेल. तुम्ही करत नसलेल्या कामासाठी तुम्हाला मोबदला दिला जाऊ नये आणि पगाराचा स्वतःहुन त्याग करावा”
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ६ एप्रिलपासून खेळाडूंना सूट दिली होती,त्यामुळे अनेक स्टार्सनी IPL च्या बायो-बबलमध्ये आगाऊ प्रवेश करणे पसंत केले जेणेकरून ते त्या दिवसापासून उपलब्ध होऊ शकतील. टॉप ऑस्ट्रेलियन पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, जोश हेझलवुड आणि मिचेल स्टार्क (आयपीएल २०२२चा भाग नाही) यांना संघात स्थान देण्यात आले नाही कारण त्यांना आयपीएल २०२२ च्या आधी विश्रांती देण्यात आली होती. या प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तान दौरा मध्यात सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “… तर कोणतीही लढाई सहजरित्या जिंकता येते”, जयंत पाटील यांचे मोठे वक्तव्य
- “सत्तेचा माज म्हणजे शिवसेना”, महिला मारहाण प्रकरणावरून भातखळकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल
- डेव्हिड वॉर्नर चित्रपटात काम करणार? इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांमध्ये चर्चा
- “महाविकास आघाडीची जत्रा आणि कारभारी सतरा”, भातखळकरांचे टीकास्त्र
- “भारत आमच्यासाठी काय आहे हे त्यांनी सांगायची गरज नाही” ट्रोल करणाऱ्यांना शमीचे सडेतोड उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
