शिर्डी : साईबाबा! संपूर्ण जगातील कोरोना महामारीचे संकट समूळ नष्ट कर आणि समस्त मानवजातीला गतजीवन जगण्याचा आनंद पूर्ववत मिळू दे, असे साकडे शिर्डीच्या साईचरणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी घातलं. आज गुरुवारी दि.३ रोजी सकाळी साडे नऊ वाजता साईबाबांचे दर्शन घेत मानवजातीच्या कल्याणाची ही त्यांनी प्रार्थना केली.
ते म्हणाले,यापूर्वी अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दोनवेळा शिर्डीमध्ये आलो होतो. परंतु; कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने दर्शन झाले नव्हते. मी भाग्यवान आहे, आज दर्शन झाले आणि धन्य वाटले. साईबाबांनी धर्म -पंथ, जात- पातीच्या पलीकडे जाऊन मानवजातीच्या उद्धारासाठी केलेले कार्य महान आहे.
कोरोना महामारीमुळे माणसा-माणसातील नातेसंबंध दुरावले असून संपूर्ण जगाचीच ताटातूट झाली आहे. कोरोना कोरोना महामारीचे हे मळभ दूर होऊन मानवाला गतजीवन जगण्याचा आनंद मिळण्यासाठी श्री. साईचरणी लीन होऊन साकडे घातलं असं त्यांनी सांगितलं.
ध्यास गोरगरीबांच्या सेवेचा…….
साईबाबांवर श्रद्धा ठेवून धर्म -पंथ, जात-पात या सगळ्याच्या पलीकडे जाऊन समस्त मानवजातीची सेवा हाच धर्म मानला. आतापर्यंत संपूर्ण आयुष्य जनतेची सेवा करण्यातच व्यतीत केले आहे. हे सेवाकार्यही अपुरेच असल्याची आपली भावना आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत गोरगरीब जनतेची सेवा अधिक जोमाने व ताकतीने करण्यासाठी निरोगी आणि उदंड आयुष्य मिळू दे! अशी प्रार्थना त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
सहा महिन्यांचे राशन घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही; द ग्रेट खली आक्रमक!
धुळे-नंदुरबारच्या निकालावरुन महाविकास आघाडीचे भविष्य काय असेल हे स्पष्ट झाले : प्रवीण दरेकर
पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची पण गरज नाही पडणार – खडसे
‘शेतकऱ्यांना पुढे करुन चीन-पाकिस्तानला देशामध्ये अस्थिरता निर्माण करायची आहे’
धनंजय मुंडे म्हणाले विजय आमचाचं; प्रीतम मुंडे म्हणतात गुलाल आमचाचं!


