पुणे – दिल्लीत राज्य सरकारच्या अधिकारावरून पुन्हा एकदा भाजपचे केंद्र सरकार, आप चे राज्य सरकार यात संघर्ष सुरु झाला आहे. राज्य सरकारचे अधिकार संकुचित करून नायब राज्यपालांकडे सर्वच प्रस्ताव दाखल करून मान्यता घेणे बंधनकारक करणारे सुधारणा विधेयक भाजप सरकारने लोकसभेत मांडले आहे. आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे अध्यक्ष रंगा राचुरे यांनी यास विरोध दर्शवत भाजप सरकार लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला आहे.
दिल्ली विधानसभेत भाजपचा धुव्वा उडवत आप चे सरकार सत्तेत आले. त्या नंतरच्या महानगरपालिका फेर निवडणुकीतही भाजपाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे आप सरकारची नाकेबंदी करण्याचे धोरण भाजपा सरकार तयार करत आहे असा आरोप होत आहे.दरम्यान,या पूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने असे आदेश काढत सर्व फायली नायब राज्यपालांकडे मान्यतेसाठी पाठवण्याचे आदेश काढले होते. त्यामुळे मोहल्ला आरोग्य क्लिनिक व सीसीटीव्ही ची अंमलबजावणी रखडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल व त्यांचे सहकारी यांनी नायब राज्यपाल यांचे घरीच धरणे धरले होते.
सुप्रीम कोर्टाच्या विशेष बेंचने यात स्पष्टता आणत राज्य सरकारच्या प्रस्तावाना राज्यपालांची मान्यता जरुरी नाही , फक्त माहिती देणे पुरेसे आहे असे सांगितले होते . असे असताना केंद्र सरकारने नवा दुरुस्ती प्रस्ताव आणत लोकनियुक्त सरकारचे अधिकार काढून घेण्याची मोहीम सुरु केली आहे. आज दिल्लीतील सरकार याचा बळी ठरले तर उद्या हेच धोरण महाराष्ट्रासारख्या विरोधी सरकारे सत्तेत असलेल्या सर्वच राज्यांच्या अधिकाराची गळचेपी केली जाण्याची शक्यता दिसते आहे.
केंद्रातील भाजपा सरकार हे लोकांचे अधिकार कमी करण्याचे व घटनेतील तरतुदी विरोधात काम करत आहे अशी खरमरीत टीका आप चे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी केली आहे. निवडणुकीत प्रलोभने दाखवत , खोटी आश्वासने देत निवडून यायचे , तसे न झाल्यास दुसरे प्रतिनिधी पळवायचे आणि तेही न जमल्यास मागील दरवाज्याने अधिकार काढून घ्यायचे, गळचेपी करायची असे भाजप ची रणनीती असून आम आदमी पार्टी सर्व स्थरावर याला विरोध करेल असेही त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘माँ, माटी और मानुष’ ! बांगलमध्ये कोणीही सुरक्षित नाहीय’
- महाराष्ट्रात महिला खरंच सुरक्षित आहेत का ? लातूर जिल्ह्यातील घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला
- वर्षावर बैठकांचे सत्र सुरूच, अजित पवार पोहचले मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला
- …म्हणून आगामी निवडणूकीत कुठल्याही पक्षासोबत युती नाही; मायावतींचा स्वबळाचा नारा
- राज्यात 18 ते 20 मार्च दरम्यान पावसाची शक्यता, जाणून घ्या कुठे पडू शकतो पाऊस?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
