Share

“राणेंना काही कामधंदा उरलेला नाही; ‘ते’ पत्र अमित शाहांनी केराच्या टोपलीत फेकून दिलंय”

Published On: 

सिंधुदुर्ग : मुंबईत गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझे यांना एनआयए कोर्टाने २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणी सुरुवातीपासूनच भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर रविवारी भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून महाराष्ट्रात त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आहे.

‘महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी अमित शहा यांच्याकडे करण्यात आली आहे,’ असं भाजप नेते नारायण राणे यांनी सांगितलं आहे.

‘नारायण राणेंच्या या मागणीची खासदार विनायक राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. ‘नारायण राणेंना काही कामधंदा उरलेला नाही. भाजपने सुद्धा त्यांना अडगळीत फेकून दिले आहे. अमित शहा यांनीही त्यांच्या पत्राची दखल घेतली नाही. त्यांचं पत्रं केऱ्याच्या टोपलीत फेकून दिलं आहे,’ अशी बोचरी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!