Share

“राजस्थान, छत्तीसगडप्रमाणेच महाष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करा”, नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्य सरकारी कर्मचारी राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचा कणा असतात. त्यांच्या कार्यकाळातील सेवेची दखल आणि उतारवयातील निर्वाहाची तरतूद म्हणून या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निवृत्तिवेतन देण्यात यावे, यासाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

नाना पटोले यांचे पत्र-

राज्य सरकारी कर्मचारी राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचा कणा असतात. त्यांच्या कार्यकाळातील सेवेची दखल आणि उतारवयातील निर्वाहाची तरतूद म्हणून या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निवृत्तिवेतन दिले जाते. राज्य सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे साडेसहा लाख आहे. राज्य सरकारने एक नोव्हेंबर २००५ पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेऐवजी अंशदानावर आधारित डीसीपीएस / एनपीएस योजना लागू केली आहे.

गेल्या काही वर्षांतील कर्मचाऱ्यांचा अनुभव लक्षात घेता ही योजना फसवी असल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार असून, ती रास्त आहे. राजस्थान आणि छत्तीसगड या काँग्रेसशासित राज्यांनी कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करणे आवश्यक आहे. ज्यामुळे या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आयुष्य जगता येईल. या विषयात आपण लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा. अशी विनंती नाना पटोले यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!