🕒 1 min read
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडी कारवाई झाल्यानंतर मविआ नेत्यांकडून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यावरच काल (२३ मार्च) राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकार दडपशाहीचं राजकारण करत असून विरोधकांकडे बोलायला मुद्दे नाहीत. विरोधक खोटे पुरावे सादर करते असल्याचे म्हटले. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे देखील पेन ड्राईव्हचे बॉम्ब फुसके निघाले, असा टोला लगावला होता. यावरच आता भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) प्रत्युत्तर दिले आहे.
“खासदार सुप्रिया सुळे यांना फुसके बार म्हणण्याची सवय असणारच कारण पवार साहेबांचं इतक्या वर्षाचे राजकारण फुसकचं निघालं. फुसक्या बारची फॅक्टरी घरातच असल्यामुळे त्यांना सगळे सारखेच वाटतात.”, असा टोला निलेश राणे ट्वीट करत लगावला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांना फुसके बार म्हणण्याची सवय असणारच कारण पवार साहेबांचं इतक्या वर्षाचे राजकारण फुसकचं निघालं. फुसक्या बारची फॅक्टरी घरातच असल्यामुळे त्यांना सगळे सारखेच वाटतात.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 24, 2022
दरम्यान ईडीने पुष्पक ग्रुपच्या (ED action taken against Pushpak Group) ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या मालमत्तेची चौकशी केली आहे. त्यात रश्मी ठाकरे यांचे सख्खे भाऊ तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) यांच्या ठाण्यातील नीलंबरी प्रकल्पातील ११ सदनिकांना टाळे ठोकण्यात आले आहे. यावरच राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- बंडातात्या कराडकरांचे महात्मा गांधीं संदर्भात वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…
- ‘त्याची आयपीएलमधील गोलंदाजी…’ रवी शास्त्रींचे हार्दिकवर मोठे वक्तव्य
- “मी पूर्ण विश्वासाने सांगतो हे तुमच्यावर उलटणार”, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
- “महाराष्ट्र अजूनही देशातच आहे, सांगा रे कुणी…”, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला
- “CBI चौकशी झाली तर ‘मोठे साहेब’…”; भाजपचा शरद पवारांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
