Share

रांचीतील मुलींची धोनीकडे क्रिकेट अकादमीची मागणी

Published On: 

झारखंड : झारखंड राज्याने भारताला अनेक सर्व उत्कृष्ट खेळाडू दिले आहेत. त्यातलेच एक नाव म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी. महेंद्रसिंह धोनी हे नाव झारखंडमधून आलेले सर्वात मोठे नाव आहे. तसेच क्रिकेटच्या मैदानावर त्याने केलेल्या कारनाम्यांनी बऱ्याच तरुणांना खेळात येण्यासाठी प्रेरित केले आहे.

दरम्यान, रांचीतील मुलींनी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे, परंतु याठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी कोणत्याही सुविधा नसल्याने त्यांचा उत्साह कमी होऊ लागला आहे. यामुळेच आता येथील मुलींनी धोनीकडे एक मागणी केली आहे.

बाढू या रांचीतील एका गावातील या मुली भारतीय क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मेहनत घेत आहेत. मात्र, मुलींना प्रशिक्षण घेण्यासाठी तेथे एकही अकादमी नाही. त्यामुळे धोनीनेच यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी या मुलींनी केली आहे. या सगळ्या मुली झारखंडमधील वेगवेगळ्या गावातून आल्या आहेत. या मुलींनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे अशी इच्छा त्यांनी धोनीकडे व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्याा बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!