मुंबई : युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटरवरून एका युवक कार्यकर्त्याला मजेशीर रिप्लाय दिला आहे. सदाशिव जरे पाटील या युवक कार्यकर्त्याने सत्यजीत तांबे यांना मेन्शन करुन एक ट्विट केलंय. चक्क स्वप्नात का होईना तुमच्यासोबत फिरण्याचा योग आला. सत्यजीत तांबे, दादा त्या दिवसाची वाट पाहतोय, असे ट्वीट सदाशिव यांनी केले. सदाशिवचं ट्विट रिट्विट करत, सत्यजीत तांबे यांनी मजेशीर उत्तर दिलं आहे.
‘सदाशिव, पेट्रोल, डिझेल स्वस्त होऊ दे, तुला हेलिकॉप्टरची सैर घडवतो’, असं म्हणत सत्यजीत तांबे यांनी वाढत्या इंधन दरवाढीवर भाष्य केले आहे. दरम्यान, वाढत्या इंधन दरवाढीवरून विरोधकांकडून केंद्रातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. काँग्रेस नेते आंदोलन करुन विविध मार्गांनी सरकारचे लक्ष वेधत आहेत.
दिवसेंदिस वाढणाऱ्या दराने आता पेट्रोल शंभरी पार केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांची किंमत कमी असतानाही भारतात मात्र,पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असल्याने, राजकीय वातावरण तापले आहे.
केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लावण्याचा प्रस्ताव आहे. इंधनावरील अबकारी करात सातत्याने वाढत आहे. त्यामुळे इंधन स्वत होईल ही अपेक्षा मावळली आहे. अबकारी कराबाबत दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे दरवाढीमुळे जनता त्रस्त आहे. यावरून विरोधक सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- चिंताजनक! लस घेतल्यानंतरही उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोना
- पुन्हा लॉकडाऊन? कोरोना फैलावत असल्याने उद्योग क्षेत्र चिंतातूर
- पैठण तालुक्यातील सर्व आठवडी बाजार पंधरा दिवसांसाठी बंद
- ‘उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे’
- पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना


