Ramdas Kadam । मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल रात्री अटक झाली. यांच्या अटकेनंतर राज्याचे राजकारण आता चांगलेच तापलेले दिसत आहे. सध्या राज्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. आता राऊत यांची अटक भाजपच्या सांगण्यावरून झाली आहे. असा गंभीर आरोप शिवसेनेकडून लावला जात आहे. या आरोपमध्ये काहीच तथ्य नाही व हे आरोप खोटे असल्याचे काल भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या प्रकरणावर आता शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला होता. आता उद्धव ठाकरेंच्या टीकांना शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
यावेळी उद्धव ठाकरे हे भाजपासोबत युती करण्यास तयार झाले होते, मात्र तिथे संजय राऊत आले आणि सर्व फिस्कटलं असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. नारायण राणे आणि नवनीत राणा यांना देखील अटक झाली होती, मात्र संजय राऊत ज्या पद्धतीने हात दाखवून गेले तेव्हा वाटलं मोठी लढाई लढायला चालले आहेत. ते लढाई जिंकून येतील, असा विश्वास त्यांना वाटत असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले कि, संजय राऊतांबद्दल मला नक्कीच अभिमान आहे. संजय माझा जुना मित्र आहे. मी त्याच्या कुटुंबीयांना भेटलो. गुन्हा काय संजयचा. पत्रकार आहे. शिवसैनिक आहे. निर्भिड आहे. जे पटत नाही ते बोलतोय. मरण आलं तरी शरण जाणार नाही. हे त्याचं वाक्य चांगलं आहे. तोही शरण जाऊ शकला असता. जे शरण झाले हमाममध्ये गेले आंघोळीला गेले. जोपर्यंत सत्तेचा फेस अंगावर आहे तोपर्यंत गेलेले आमच्यावर टीका करू शकतात, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- NCP on Eknath Shinde | “मुख्यमंत्री जर ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील तर…” ; राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ शिंदेना आव्हान
- Uddhav Thackeray | इतरांना संपवण्याच्या मागे लागाल तर दिवस सर्वदा सारखे नसतात – उद्धव ठाकरे
- Deepak Kesarkar । राऊतांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ, मग यामिनी जाधव, भावना गवळींना का भेटले नाही?; केसरकरांचा सवाल
- Udhav Thackeray। संजयचा मला अभिमान, राऊतांच्या ईडी अटकेवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
- Uddhav Thackeray | “आमची वेळ येईल तेव्हा…” राऊतांच्या अटकेवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

