Share

Deepak Kesarkar । राऊतांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ, मग यामिनी जाधव, भावना गवळींना का भेटले नाही?; केसरकरांचा सवाल

Published On: 

Deepak Kesarkar । मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. मध्यरात्री रात्री 12 वाजता ईडीने ही कारवाई केली. अटक करण्यापूर्वी संजय राऊत यांची 16 तास चौकशी करण्यात आली होती. त्यांना आज मुंबईतील पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं आहे. त्यांना ४ दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावरून आता शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

केसरकर म्हणाले की, केवळ राजकीय व्यक्तीवर कारवाई झाली असे नाही. जे निर्दोष असतील त्यांनी पुरावे सादर करावे. यापूर्वी भावना गवळी, यामिनी यादव आदींनी पुरावे सादर केल्यामुळे त्यांच्यावरील कारवाई रोखण्यात आली. राऊतांच्या घरी जाणारे उद्धव ठाकरे हे यामिनी जाधव, भावना गवळी यांच्यावरील कारवाईनंतर भेटायला गेले नाहीत. यामिनी जाधव व भावना गवळी यांनी स्वतःलाच ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागले, असा टोला त्यांनी लगावला. आता केसकरांच्या या टीकेवर शिवसेनेतून काय प्रतिक्रिया येतेय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, याआधी आता थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या परिवाराची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या भांडुप मधील निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या आई आणूनि पत्नीची भेट घेतली. यावेळी त्यांनी राऊतांच्या कुटुंबियांना धीर दिला त्यांची विचारपूस केली. मात्र यावेळी त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र राऊत कुटुंबियांच्या भेटीनंतर ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!