Share

Udhav Thackeray। संजयचा मला अभिमान, राऊतांच्या ईडी अटकेवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray । मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल रात्री अटक झाली. यांच्या अटकेनंतर राज्याचे राजकारण आता चांगलेच तापलेले दिसत आहे. सध्या राज्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. आता राऊत यांची अटक भाजपच्या सांगण्यावरून झाली आहे. असा गंभीर आरोप शिवसेनेकडून लावला जात आहे. या आरोपमध्ये काहीच तथ्य नाही व हे आरोप खोटे असल्याचे काल भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या प्रकरणावर आता शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पुन्हा हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले कि, संजय राऊतांबद्दल मला नक्कीच अभिमान आहे. संजय माझा जुना मित्र आहे. मी त्याच्या कुटुंबीयांना भेटलो. गुन्हा काय संजयचा. पत्रकार आहे. शिवसैनिक आहे. निर्भिड आहे. जे पटत नाही ते बोलतोय. मरण आलं तरी शरण जाणार नाही. हे त्याचं वाक्य चांगलं आहे. तोही शरण जाऊ शकला असता. जे शरण झाले हमाममध्ये गेले आंघोळीला गेले. जोपर्यंत सत्तेचा फेस अंगावर आहे तोपर्यंत गेलेले आमच्यावर टीका करू शकतात, अशी पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. नड्डांचे विधान हे देशाला हुकूमशाहीकडे नेणारे असून, ओडिसा, तेलंगणा, तामिळनाड महाराष्ट्रात शिवसेना ही संपण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हा एकदा करून बघावं असे आव्हान ठाकरे यांनी नड्डांना दिले आहे. तसेच पुढे पक्षात काम केलेले लोक आपल्याकडे येत आहेत. मग जर इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येणार असतील तर, मग भाजपचा वंश तरी नेमका कोणता हे तपासणे महत्त्वाचे आहे, असं ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, याआधी आता थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या परिवाराची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या भांडुप मधील निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या आई आणूनि पत्नीची भेट घेतली. यावेळी त्यांनी राऊतांच्या कुटुंबियांना धीर दिला त्यांची विचारपूस केली. मात्र यावेळी त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!